अन्यायकारक विधेयकांविरोधात कऱ्हाडात शेतकरी आक्रमक

अन्यायकारक विधेयकांविरोधात कऱ्हाडात शेतकरी आक्रमक
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : केंद्र सरकारने लादलेले शेतकरीविरोधी कायदे मागे घेण्यासाठी कऱ्हाड तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनातील माहिती अशी, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, कुठलीही चर्चा न करता अन्यायकारक तीन विधेयके मंजूर केलेली आहेत. अन्यायकारक विधेयकांविरोधात आठ दिवसांपासून देशातल्या लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. मात्र, केंद्र सरकारने हे आंदोलन विविध मार्ग वापरून चिरडण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू ठेवला आहे. 

मात्र, लाखो शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेपुढे सरकारला झुकावे लागले आणि सरकार चर्चेस तयार झाले. मात्र, अद्याप मार्ग निघालेला नाही. तिन्ही विधेयके रद्द करावीत म्हणून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत असून, ही विधेयके रद्द करावीत, अशी मागणी शिवाजी पाटील, रवींद्र यादव, सचिन महाडिक, दादासाहेब पाटील, अनिल साळुंखे व शेतकऱ्यांनी केली आहे. हे निवेदन नायब तहसीलदार विजय माने यांना देण्यात आले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Who is Yashwant Jagtap from Satara?
Satara Pune Highway monsoon road safety
Sanjivaraje Naik-Nimbalkar Alleges Conspiracy to Close Cooperative Sugar Factory
Original Members' Rights Must Be Protected, Says MP on Shriram Cooperative
Marathi News Esakal
www.esakal.com