नांदलापूर, कालगावच्या 10 दगडी खाणी सील; प्रांताधिकाऱ्यांची धडक कारवाई

अवैधरित्या सुरु असणारे गौण खनिज उत्खनन थांबवुन पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत उत्खनन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
crime
crimeSakal
Updated on

कऱ्हाड - नांदलापूर, कालगाव (ता. कऱ्हाड) येथील खडी क्रशरसाठी अवैधरित्या उत्खनन होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या आदेशावरुन प्रभारी तहसीलदार आनंदराव देवकर यांच्या पथकाने धडक कारवाई करत १० खाणी सील केल्या. अवैधरित्या सुरु असणारे गौण खनिज उत्खनन थांबवुन पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत उत्खनन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

कऱ्हाड तालुक्यातुन वाळु, दगडांचे उत्खन्नन मोठ्या प्रमाणात केले जाते. ते करताना अनेकदा अवैधरित्या केले जात असल्याचेही यापुर्वी तहसील कार्यालयाने केलेल्या कारवाईतुन स्पष्ट झाले आहे. पर्यावरणाची हानी होऊन नैसर्गिक साधन सामग्रीचे नुकसान होत असल्याबाबत सामाजिक संघटनांना तहसीलदार कार्यालयाकडे निवेदनाव्दारे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेवुन प्रांताधिकारी दिघे, प्रभारी तहसीलदार देवकर यांच्या पथकाने संबंधित ठिकाणच्या क्रशरना आवश्यक कागदपत्रे, परवानग्या, भरलेली रॉयल्टी चलने यांची माहिती दोन दिवसात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

नियम डावलुन अवैध गौण खनिज उत्खनन करणारे, अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मंडलाधिकारी, गावकामगार तलाठी यांच्या मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचाही इशारा तहसीलदार देवकर यांनी दिला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com