पिलीव घाटात सातारा-पंढरपूर बसवर दगडफेक; दरोड्याच्या अफवेने सातारा-सोलापूर पोलिसांची पळापळ

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

सातारा : मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा-पंढरपूर एसटी बसवर पिलीव घाटात अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. यात बस चालक जखमी झाला. त्याही अवस्थेत चालकाने बस पुढे नेत घाटातून येणाऱ्या इतर वाहनांना धोक्याची माहिती दिली. बस घाटात थांबली असती, तर काहीतरी विपरीत घडले असते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा आणि सोलापूर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला.

रात्री पंढरपूरमधून प्रवासी घेऊन एसटी बस साताऱ्याकडे येत होती. बस पिलीव घाटातून मार्गस्थ होत असतानाच 10 ते 15 हल्लेखोरांनी बसवर दगडफेक केली. यात बसची पुढील काच फुटून चालक जखमी झाला. धोका जाणवल्याने चालकाने बस तशीच पुढे दामटली. पुढे जात चालकाने घाटातील धोक्याची माहिती इतर वाहन चालकांना देणे सुरू केले. यामुळे घाटातील वाहतूक काही वेळातच ठप्प झाली. माहिती मिळाल्यानंतर पोलिस आले आणि त्यांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला. घाटात शोध घेतल्यानंतर घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आली. बसवरील दगडफेक लुटमारीच्या उद्देशाने झाल्याची चर्चा असली तरी त्याला दुजोरा मिळाला नाही.

दगडफेकीत एक दुचाकीस्वार देखील जखमी झाला आहे. दरम्यान, काही हल्लेखोरांनी येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांवर दगडफेक केली. तसेच एसटीवर दगडफेक करत गाडीच्या काचा फोड्याचा प्रयत्न केला. माळशिरस व म्हसवड पोलिस घटनास्थळी दाखल असून लवकरच परिसरात कोंबिग ऑपरेशन राबविले जाणार आहे, तसेच हा दरोडा नसून अज्ञातांनी बसवरती केलेला हल्ला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी ई-सकाळशी बोलताना दिली. दगडफेक करणाऱ्यांचा सातारा आणि सोलापूर पोलिस संयुक्तपणे शोध घेत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Cannot Speak or Walk, Yet Shivprasad Achieves 66% in SSC and Inspires Many
Virmade Fata on Pune-Bengaluru Highway Becomes Accident-Prone Zone
Government to Verify All E-Peek Entries Under Revised Transparency Rules
Simplicity and Memories: Mahadev Jankar Shares Emotional Moments with Shepherds
Marathi News Esakal
www.esakal.com