पदाची झूल बाजूला सारून एकनाथ शिंदेंनी रुजवली मायभूमीत स्ट्रॉबेरी

रविकांत बेलोशे
Friday, 27 November 2020

मंत्रालयात गरजणारे दरे या कोयनकाठचे भूमिपुत्र आता स्ट्रॉबेरी शेतात ही शेतकरी म्हणून आपला ठसा उमटवततील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

भिलार (जि. सातारा) : राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे रोजच्या धावपळीतून आपल्या जन्मगावी महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब येथे आले असून त्या ठिकाणी त्यांनी दोन दिवस आपल्या स्वतःच्या शेतात स्वतः शेतकरी बनून स्ट्रॉबेरी लागवड केली. राजकारणात उच्च पदावर गेले तरी त्यांनी आपली शेतकरी म्हणून गावाची नाळ अजूनही त्यांनी कायम ठेवली असल्याचे यावरून दिसून आले.

एकनाथ शिंदे राजकारणात नुसते बोलत नाहीत तर ते करूनही दाखवतात. शेतकरी कुटुंबातील असल्याने मुंबईत वास्तव्यास असले तरी गावाकडे मात्र त्यांचे कायम लक्ष असते. गावात यात्रा व सुट्टीच्या काळात आल्यावर ते नेहमी शेतात रमत असतात.
 
कोयनाकाठचे शेतकरी एकनाथ शिंदे यांचे दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) या आपल्या गावात सध्या आले आले आहेत. गेले दोन दिवस त्यांनी स्वतःच्या शेतात व्हर्टीकल तसेच गादी वाफे पद्धतीने स्ट्रॉबेरी लागवडीचे तंत्र भिलारचे स्ट्रॉबेरी तज्ञ व उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी गणपत शेठ पारटे, शेतकरी प्रवीण शेठ भिलारे, शशिकांत भिलारे यांचेकडून जाणून घेतले. त्यानुसार त्यांनी आपल्या हाताने लागवड करण्याचाही मनमुराद आनंद घेतला. त्यामुळे मंत्री महोदयांच्या या साध्या वागण्याचे आणि स्वतः शेतात कष्ट करण्याच्या या उमेदीची सर्वत्र चर्चा होत आहे.
मिर्झापूरचा रॉबीन गर्लफ्रेंडसोबत अडकला विवाहबंधनात, पाहा लग्नसोहळ्याचे फोटो 

मंत्रालयात जावून प्रश्न मांडताना अनुभव घेवुन आणि प्रत्यक्ष पाहून मगच प्रश्न मांडण्याची शिंदेंची वेगळी हातोटी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दुःख त्यांनी जवळून अनुभवली आहेत. गतवर्षी मंत्रिपदाची झूल बाजूला सारून शिंदे यांनी आपले पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमवेत गावात स्वतःच्या शिवारात फेरफटका मारून शेतीत कामही केले होते. शेततळे व बंधाऱ्यालागत वृक्षारोपणही केले. त्यामुळे त्यावेळी ही खासदार आणि आमदार पिता पुत्रांचे मायभुमीकडे असणारी ओढ दिसून आली. मंत्रालयात गरजणारे दरे या कोयनकाठचे भूमिपुत्र आता स्ट्रॉबेरी शेतात ही शेतकरी म्हणून आपला ठसा उमटवततील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
लालचुटूक स्ट्रॉबेरी चाखत पर्यटक लुटताहेत पाचगणी- महाबळेश्वरात सुटीचा आनंद
 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strawberry Farming By Minister Eknath Shinde In Dare Village Near Mahableshwar Satara News