
-संजय जगताप
मायणी : येथील गावभाग व काही उपनगरांतील नागरी वस्तीत मोकाट कुत्री, डुकरे व गाढवांनी उच्छाद मांडला असून, त्यामुळे आबालवृद्ध नागरिक शेतकरी त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही संबंधित जनावरांचे मालक दाद देत नसल्याने लोक हवालदिल झाले आहेत. त्यांच्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने कठोर कारवाई करावी. प्रतिबंधात्मक सर्वतोपरी उपाययोजना करून लोकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.