ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

कऱ्हाड (जि. सातारा) : शाळा घेत असलेल्या ऑनलाइन शिक्षणासाठी घरातून मोबाईल मिळू न शकल्याने अभ्यास चुकतोय या तणावाखाली दहावीतील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. ओंड (ता. कऱ्हाड) येथे बुधवारी (ता. 23) ही घटना घडली होती. मात्र, आत्महत्येचे कारण मंगळवारी (ता. २९) तपासात स्पष्ट झाले. साक्षी आबासाहेब पोळ (वय 15) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. 

आई स्वाती यांनी दिलेल्या जबाबानुसार, श्रीमती स्वाती या ओंडमध्ये मजुरी करतात. साक्षी ही ओंड येथील हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होती. शाळेचे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तो अभ्यास चुकत असल्याने साक्षीने आईकडे मोबाईलसाठी मागणी केली होती. वारंवार मागणी करूनही आईला मोबाईल घेऊन देता आला नाही. अभ्यास चुकतोय या तणावात साक्षी होती. अखेर तिने आई कामावर गेल्यानंतर घरात कोणीही नाही पाहून घरात गळफास लावून घेतला. 

पोलिस निरीक्षक धुमाळ म्हणाले, साक्षीचा अभ्यास चुकत होता. शाळा ऑनलाइन शिक्षण देत आहे. त्यासाठी मोबाईल पाहिजे होता. मात्र, तो तिला न मिळाल्याने व अभ्यास चुकतोय या तणावाखाली साक्षीने आत्महत्या केल्याचा जबाब तिची आई स्वाती यांनी दिला आहे.'' तपास पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाळासाहेब जगदाळे करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com