विद्यार्थी दिवस : डॉ. आंबेडकरांचा चिमुकल्या पावलांनी प्रतापसिंग हायस्कूलमध्ये पहिल्या इयत्तेत प्रवेश!

विद्यार्थी दिवस : डॉ. आंबेडकरांचा चिमुकल्या पावलांनी प्रतापसिंग हायस्कूलमध्ये पहिल्या इयत्तेत प्रवेश!
Updated on

सातारा : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर' हा विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्रभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या दिवशी १९०० साली बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या प्रतापसिंग हायस्कूलमध्ये (तेव्हा 'गव्हर्नमेंट हायस्कूल') पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला होता. त्या वेळी त्यांचे नाव भिवा असे होते. या शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. 

आज 7 नोव्हेंबर. आजचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी दिवस (Student Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मुख्यत्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शैक्षणिक वाटचाल खूपच रोमहर्षक आहे. हुशार, कुशाग्र बुद्धिमत्ता यांसारख्या अनेक पैलूंमधून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वर्णन करतो. आंबेडकरांना स्वत: देखील आजन्म विद्यार्थी मानले. म्हणूनच शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले. मात्र, आपल्यापैकी ब-याच जणांना ही गोष्ट माहित नसेल की, शासनाने हाच दिवस विद्यार्थी दिवस म्हणून का निवडला? तर त्याला ही तसे विशेष कारण आहे. 

7 नोव्हेंबर 1900 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे ते इ.स. 1904 पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. त्यानंतर 2003 पासून पत्रकार अरुण जावळे हे शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करत आले आहेत. त्यांनी या दिनाला विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करावा, अशी शासनाकडे अनेकदा मागणी केली. त्यानंतर शेवटी 2017 साली महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केला. 

अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनाचे स्मरण व्हावे म्हणून, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी, यासाठी शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com