
या अपघाताची नाेंद औंध पोलिस ठाण्यात झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
औंध (जि. सातारा) : औंध-घाटमाथा रोडवर नांदोशी पुलानजीक औंधवरून घाटमाथ्याकडे जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरने औंधकडे येणाऱ्या टेम्पोला धडक दिली. त्यामध्ये टेम्पोचालक जखमी झाला असून टेम्पोचेही नुकसान झाले आहे.
औंधवरून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (क्र. एम. एच. 23 एच. 8631) हा घाटमाथ्याकडे चालला होता, तर कऱ्हाडहून औंधमार्गे सिद्धेश्वर कुरोलीला माल घेऊन टेम्पो (क्र. एम. एच. 11 एम. 4582) निघाला होता. नांदोशी पुलानजीक आल्यानंतर भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने सरळ टेम्पोला धडक दिली. त्याचवेळी उसाने भरलेल्या दोन्ही ट्रॉली पलटी झाल्या.
कास, ठोसेघरला दिवाळीनंतर भेट देणार : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
या अपघातात टेम्पोचे नुकसान होऊन त्यातून काही मालही रस्त्यावर पडला. टेम्पोचालक आजमुद्दीन पटेल (रा. वाघेरी) यांनी औंध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात कॅमेरात कैद
सविस्तर बातमीसाठी https://t.co/2L5zlRltMk#Trending #Satara
Source @saamTVnews pic.twitter.com/qFe32YQdIV— Siddharth Latkar (@siddharthSakal) November 2, 2020
Edited By : Siddharth Latkar