Mayani News : ‘पॅट’मुळे फिरले उन्हाळी सुटीतील नियोजनावर पाणी; परीक्षा लांबल्याने विद्यार्थी, पालक संतप्त, चाकरमान्यांचा गावाकडे जाण्याला बसला खो

शाळांच्या वार्षिक परीक्षांसोबतच पॅट (प्रोग्रेसिव्ह अचिव्हमेंट टेस्ट) परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांत प्रचंड नाराजीचा सूर आहे.
Pat Exam

Pat Exam

sakal

Updated on

मायणी - शाळांच्या वार्षिक परीक्षांसोबतच पॅट (प्रोग्रेसिव्ह अचिव्हमेंट टेस्ट) परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांत प्रचंड नाराजीचा सूर आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संपणाऱ्या परीक्षा यंदा थेट २३ एप्रिलपर्यंत लांबल्याने चाकरमान्यांच्या उन्हाळी सुटीतील नियोजनावर पाणी फिरले आहे. त्यामुळे यंदा अनेकांनी गावाकडे जाण्याचा बेतच रद्द करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com