

सातारा : साताऱ्याचा रेसर श्लोक विक्रम घोरपडे याने डर्ट ट्रॅक आणि सुपरक्रॉस या रेसिंगच्या दोन्ही प्रकारांत अजिंक्यपद मिळवून पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. आजोबा रमेश शानभाग यांच्या प्रेरणेतून रेसिंगची आवड निर्माण झालेल्या श्लोकने अवघ्या १७ वर्षी केलेल्या कामगिरीमुळे साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.