esakal | नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार; पोलिस अधीक्षकांचे स्पष्ट संकेत

बोलून बातमी शोधा

Police Ajaykumar Bansal

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार; पोलिस अधीक्षकांचे स्पष्ट संकेत

sakal_logo
By
अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (सातारा) : नियम न पाळणाऱ्यांवर यापुढील काळात कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी येथे सांगितले. येथील पोलिस ठाण्यात बाधित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बन्सल यांनी पोलिस ठाण्यास भेट देऊन कोरोनामुळे उद्‌भवलेल्या स्थितीचा आढावा घेतला.

या वेळी पोलिस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी उपस्थित होते. बाधित कर्मचाऱ्यांची माहिती देताना कोंडुभैरी यांनी सांगितले, की येथील सर्वच कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. पोलिस ठाण्याची भेट झाल्यानंतर अजयकुमार बन्सल यांनी शहरातून फेरफटका मारून लॉकडाउनच्या नियमांचे नागरिक पालन करतात का, याची माहिती घेतली. त्यांनी पोलिस ठाणे ते सुभाष चौक असा फेरफटका मारला. या वेळी काही जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू होती.

कुख्यात गुंड गज्या मारणेच्या टोळीशी संबंध; पुण्यातील 14 जणांना वाईत अटक

तेथील दुकानदारांची बन्सल यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले. अधीक्षक बन्सल म्हणाले, "ब्रेक द चेनसाठी लॉकडाउन लागू केला, तरी कोरोना नियंत्रणात येत नाही. त्यामुळे कडक लॉकडाउन करवा लागेल. शहरात लॉकडाउनचे नियमांचे पालन चांगल्या प्रकारे केले जात आहे. पर्यटकांची आवकही मंदावली आहे; परंतु नागरिकांनी लस घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.''

Edited By : Balkrishna Madhale