Bribery News: पुरवठा निरीक्षक लाचप्रकरणी जाळ्यात ;दहिवडीत ‘लाचलुचपत’ची कारवाई; रेशन दुकानदाराला मागितले पैसे

Supply Inspector Bribery Case : सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे स्वस्त धान्य दुकानाचा मासिक कोटा मंजूर करून वाढवून देण्यासाठी ३,५०० रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून पुरवठा निरीक्षक मेघराज जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
The Anti-Corruption Bureau caught a supply inspector while allegedly accepting a ₹3,500 bribe in Dahivadi.

The Anti-Corruption Bureau caught a supply inspector while allegedly accepting a ₹3,500 bribe in Dahivadi.

esakal

Updated on: 

दहिवडी : स्वस्त धान्य दुकानाचा मासिक कोटा मंजूर करून तो वाढवून देण्यासाठी तीन हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना माण (दहिवडी) तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. मेघराज बाळासाहेब जाधव (वय ३५, रा. वाकेश्वर रोड, वडूज, ता. खटाव, जि. सातारा) असे लाच घेणाऱ्या पुरवठा निरीक्षकाचे नाव असून, तो तहसील कार्यालयात वर्ग-तीन पदावर कार्यरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com