Paragliding Accident : पॅराग्लायडिंग करताना 400 फूटाहून कोसळला, साताऱ्यातील पर्यटकाचा मृत्यू

कुल्लू जिल्ह्यातील डोभी गावाजवळ पॅराग्लायडिंग करताना हा प्रकर घडला.
Suraj Shah tourist from satara falls to death while paragliding in Himachal Pradesh
Suraj Shah tourist from satara falls to death while paragliding in Himachal Pradesh

Maharashtra tourist dies while paragliding : पॅराग्लायडिंग करताना 400 फूटाहून कोसळला, साताऱ्यातील पर्यटकाचा मृत्यूहिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे पॅराग्लायडिंग करताना महाराष्ट्रातील साताऱ्यातील एका पर्यटकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. या घटनेतील मृताचे नाव सूरज संजय शाह (30) असून कुल्लू जिल्ह्यातील डोभी गावाजवळ पॅराग्लायडिंग करताना हा प्रकर घडला.

कुल्लू येथील पाटलीकुहल पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शाह यांच्यासह चार जणांचा एक गट या भागात आला होता आणि पॅराग्लायडिंग राईड बुक केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा यांच्या एका मित्राने याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार, त्यांची एक महिला मैत्रिण शाह यांच्या आधी पॅराग्लायडिंग राईडवर गेली आणि सुरक्षितपणे जमिनीवर आली. पुढे, शाह यांना राईडवर नेण्यात आले आणि टेकऑफ केल्यानंतर लगेचच ते सुमारे 300-400 फूट उंचीवरून जमिनीवर पडले.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Suraj Shah tourist from satara falls to death while paragliding in Himachal Pradesh
Crime News : नोकरीहून काढणं बेतलं जीवावर; कामगारांनी मालकासह तिघांना संपवलं

पोलिसांनी सांगितले की, ते उड्डाणा दरम्यान हार्नेसचा सुरक्षा बेल्ट कसा उघडला याचा तपास करत आहेत. स्टेशन हाऊस ऑफिसर राजीव लखनपाल यांनी अपघाताच्या कारणाबद्दल आम्हाला तज्ञांचे मत घ्यावे लागेल अशी माहिती दिली आहे.

दरम्यान पोलिसांनी पायलट विमल देव यांना अटक केली आहे आणि त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 336 आणि 304A अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Suraj Shah tourist from satara falls to death while paragliding in Himachal Pradesh
एकनाथ शिंदेंचा गेम होणार? 20 आमदार फोडून फडणवीस लवकरच मुख्यमंत्री 'या' नेत्याचं मोठं विधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com