तिसऱ्या लाटेचा सामना कसा करणार?; झेडपी सदस्याचा प्रशासनाला सवाल

कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णाचा प्रतिदिन हजाराचा आकडा दुसऱ्या लाटेत अडीच हजारांवर पोचला.
Coronavirus
Coronavirusesakal
Updated on

कलेढोण (सातारा) : कोरोनाच्या (Coronavirus) पहिल्या लाटेत रुग्णाचा प्रतिदिन हजाराचा आकडा दुसऱ्या लाटेत अडीच हजारांवर पोचला. रुग्णांना बेड मिळवताना प्रचंड धावपळ करावी लागत आहे. आता तिसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने काय तयारी केली आहे, याबाबत जनतेला जिल्हाधिकाऱ्यांनी आश्‍वस्थ करावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे (Surendra Gudge) यांनी केले. (Surendra Gudge Demanded That The Administration Prepare For The Fight Against Coronavirus)

कोरोनाच्या पहिल्या लाटेविरुद्ध लढताना कोणतीही सिस्टिम तयार नव्हती. त्यामुळे सिस्टिम तयार होईपर्यंत लॉकडाउन पाळण्यात आले. त्यानंतर सिस्टिम तयार झाली. परंतु, दोन लाटेमधील वेळ प्रशासनाने वाया घालवला आणि दुसऱ्या लाटेशी लढताना लागणारी यंत्रणा वाढविण्यात प्रशासन कमी पडले. त्यामुळे रुग्णांना बेड मिळत नाही, अशा गंभीर अवस्थेला सामोरे जावे लागले. कोरोना रुग्णांपैकी जवळपास 70 टक्के रुग्ण घरीच आयसोलेशनमध्ये बरे होतायत.

Coronavirus
सातारकरांनाे! सिव्हिलला निघालात? थांबा, RT-PCR लॅब पडलीय बंद

30 टक्के रुग्णांना सेवा देताना प्रशासनाची दमछाक झालीय. आता यातून धडा घेऊन तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी प्रशासन काय तयारी करीत आहे, हे जाणून घेण्याचा जनतेचा अधिकार आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी जनतेशी संवाद साधावा. पहिल्या लाटेत साधे, ऑक्‍सिजनयुक्त व व्हेंटिलेटरयुक्त किती बेड उपलब्ध होते, आत्ता किती आहेत, तिसऱ्या लाटेपर्यंत आपण किती उपलब्ध करणार आहोत, याचे नियोजन जनतेला माहीत करून द्यावे. औषधे व ऑक्‍सिजनची कमतरता दुसऱ्या लाटेत आहे. त्याबाबत तिसऱ्या लाटेतही अवस्था नसेल, याबाबत नियोजनाची खात्री जनतेला द्यावी, असे श्री. गुदगे यांनी म्हटले आहे.

शासनाने जिल्हा नियोजनमधून 122 कोटी उपलब्ध करून दिले. त्यामुळे निधीची कमतरता नाही. मात्र, इन्फ्रास्ट्रक्‍चर उभे करताना मोठी दिरंगाई होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन संथ कसे काम करीत आहे? याला गती मिळणार का नाही?

-सुरेंद्र गुदगे, जिल्हा परिषद सदस्य

Tauktae Cyclone : अंबवडेत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; नुकसान होऊनही पंचनामे नाहीत!

Surendra Gudge Demanded That The Administration Prepare For The Fight Against Coronavirus

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com