
कऱ्हाड : सातारा व सांगली जिल्ह्यांतील तीन तालुक्यांत १०५ गावांसाठी नव्याने साकारणाऱ्या येवती-म्हासोली व गुढे-पाचगणी अशा दोन वेगवेगळ्या उपसा जलसिंचन योजनांना तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. त्यादृष्टीने शासन सर्व्हे करणार आहे. मंगळवार (ता. २१) पासून वारणावती येथून त्याचा सर्व्हे सुरू होणार आहे. त्या सर्व्हेसाठी शासनाने एक कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर केला आहे.