
- प्रवीण जाधव
सातारा : रांची (झारखंड) येथे नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया पोलिस मीटमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या जिल्हा पोलिस दलातील श्वान पथकातील सूर्या या श्वानाची आज शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. स्फोटक शोधण्याच्या कौशल्यात जिल्ह्याला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे.