
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही विधेयके त्वरित रद्द करावीत अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी केंद्र सरकार विरोधात तीव्र आंदोलन करून सरकारला जागे करण्याचे काम करेल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
क-हाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने क-हाड तहसीलदार कार्यालयासमोर गुरुवारी रात्री अचानक जागर आंदोलन करण्यात येणार आले. हे आंदाेलन दिल्लीत सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदाेलनास पाठिंबा दर्शविणयासाठी हाेते.
गेल्या महिन्यापासून पंजाब, हरियाणा येथील शेतकरी रेल्वे सेवा बंद पाडून आंदोलन करत होते. मात्र केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी अखेर दिल्ली येथे जाऊन आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. तेथे गेल्या सात दिवसांपासून आंदोलन चालू आहे. त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिल्लीच्या सिमेवर रोखून ठेवले व कडाकाच्या थंडीत शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा, अश्रुधुराच्या फैरी व रस्त्यात जागोजाग खंदक खोदून त्यांना अडवून ठेवण्यात आलेले आहे.
हे शेतकरी शांततेच्या मार्गाने केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कृषी विधेयकाला विरोध करून ती विधेयके त्वरित रद्द करण्यात यावीत यासाठी आंदोलन करत आहेत. हे शेतकरी फक्त पंजाब व हरियाणाच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत नाहीत तर ते शेतकरी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर जागर आंदोलन करून दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत हे दाखवून देत आहोत. वेळ पडल्यास दिल्ली येथेही ही जाण्यास तयार आहोत.
पुणे-बंगळूर महामार्गावरील कार अपघातात पुण्याचे दोघे जागीच ठार
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही विधेयके त्वरित रद्द करावीत अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी केंद्र सरकार विरोधात तीव्र आंदोलन करून सरकारला जागे करण्याचे काम करेल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष दादासाहेब यादव , जिल्हा प्रवक्ते विकास पाटील, कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष बापूसो साळुंखे, पक्षाचे कराड दक्षिण अध्यक्ष रामभाऊ साळुंखे, संघटनेचे कराड उत्तरचे तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे व शेतकरी उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar