शेतकरी हिताच्या कायद्यासाठी सोमंथळीत "स्वाभिमानी'चे आंदोलन

दीपक मदने
Sunday, 7 February 2021

शेतकरी हिताच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी दिला. 

सांगवी (जि. सातारा) : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमंथळी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नुकतेच चक्काजाम आंदोलन केले. फलटण- बारामती रस्त्यावर सोमंथळी येथे "रास्ता रोको' आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांनी फलटण- बारामती महामार्गावर ठिय्या आंदोलन करून मागण्या मान्य करण्याची मागणी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फलटण- बारामती मार्ग रोखला. या वेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष नितीन यादव, सचिन खानविलकर, दादा जाधव, प्रमोद गाडे, अक्षय चव्हाण, बाळासाहेब शिपकुले, हिटलर अलगुडे, नाना अहिवळे, अक्षय लोंढे, रोहन मोहिते, रोहन चव्हाणसह शेतकरी महिला सहभागी झाल्या होत्या. 

दरम्यान, शेतकरी हिताच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी दिला. 

कमी करा कमी करा इंधन दरवाढ कमी करा; मेढ्यात शिवसैनिक आक्रमक

मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात भडका; इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीची पेटली चूल

सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र, त्याचा संयमाने वापर व्हावा : डॉ. दाभोलकर

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana Chakka Jam Satara Farmers Protest Marathi News