esakal | कृषी विधेयकावरुन स्वाभिमानी आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी विधेयकावरुन स्वाभिमानी आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत कोणतीही चर्चा न करता आवाजी मतदानाद्वारे शेतकरीविरोधी विधेयक मंजूर केले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून, त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.

कृषी विधेयकावरुन स्वाभिमानी आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : केंद्र सरकारने शेतीचे खासगीकरण करणारी शेतकरीविरोधी विधेयके पारित करून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथे शेतकरीविरोधी विधेयक फाडून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. 

येथील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, स्वाभिमानीतर्फे आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना देवानंद पाटील, प्रमोद जगदाळे, रामचंद्र साळुंखे, दादासाहेब यादव यांनी दिले. 

निवेदनात केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत कोणतीही चर्चा न करता आवाजी मतदानाद्वारे शेतकरीविरोधी विधेयक मंजूर केले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून, त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारने तत्काळ हे शेतकरीविरोधी विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top