esakal | हिप हिप हुर्ये... स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कऱ्हाड पालिका देशात अव्वल
sakal

बोलून बातमी शोधा

हिप हिप हुर्ये... स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कऱ्हाड पालिका देशात अव्वल

कराड शहरात कचरा संकलन, विलगीकरण व त्यावर प्रक्रिया करण्यात नगरपालिका 100 टक्के यशस्वी झाली आहे. त्यामुळे पालिकेस कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन आहे. कृष्णा नदीचे सौंदर्यीकरण, भूमिगत गटारे, सांडपाण्यावर प्रक्रिया, शेतीसाठी त्याचा पुनर्वापर, सार्वजनिक शौचालये, ओल्या कचऱ्यावरील प्रक्रिया, बारा डबरे येथे स्वच्छता उद्यान अशा विविध पातळ्यांवर पालिकेने यश मिळवले आहे.

हिप हिप हुर्ये... स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कऱ्हाड पालिका देशात अव्वल

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कऱ्हाड पालिकेने दुसऱ्यांदा बाजी मारत यंदाही देशात पहिला क्रमांक पटकावला. एक लाख लोकसंख्येच्या पालिका गटात कऱ्हाड शहर अव्वल ठरले. आज (गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे त्याची अधिकृत घोषणा झाली. ही घाेषणा हाेताच कऱ्हाड पालिकेत उत्साहाचे वातावरण हाेते.

गत वर्षी याच स्पर्धेत कऱ्हाड पालिकेने एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. यंदाही स्पर्धेत कऱ्हाड देशात अव्वल क्रमांकावर ठरेल, असेच काम पालिकेच्या माध्यमातून झाले हाेते. 

जाणून घ्या... डाॅ. नरेंद्र दाभाेलकरांच्या या पैलूंविषयी 

आज घाेषणा हाेताच जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी पालिका कर्मचारी, अधिकारी, सर्व सदस्य तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळे हे झाल्याचे नमूद केले. ते म्हणाले, ""मागील वर्षी सुमारे चार हजार शहरांमध्ये कऱ्हाडचा प्रथम क्रमांक आला होता. यंदाही पालिका स्पर्धेत अव्वल राहील असा विश्वास हाेता. 

नागरिकांनी पालिकेच्या स्वच्छता विषयक उपक्रमांना भरघोस पाठिंबा दिला. त्यामुळे पालिका स्वच्छ सर्वेक्षणात अग्रेसर राहिली आहे. पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे परिश्रम त्यामागे आहेत. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका व गट नेते, स्वच्छता दूत, 105 सामाजिक संस्था, त्यांचे प्रतिनिधी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकांचेही सहकार्य लाभले आहे. या यशात तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगेंचा सिंहाचा वाटा आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 'ही' आधार नोंदणी घेऊन आली नामी संधी

शहरात कचरा संकलन, विलगीकरण व त्यावर प्रक्रिया करण्यात नगरपालिका 100 टक्के यशस्वी झाली आहे. त्यामुळे पालिकेस कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन आहे. कृष्णा नदीचे सौंदर्यीकरण, भूमिगत गटारे, सांडपाण्यावर प्रक्रिया, शेतीसाठी त्याचा पुनर्वापर, सार्वजनिक शौचालये, ओल्या कचऱ्यावरील प्रक्रिया, बारा डबरे येथे स्वच्छता उद्यान अशा विविध पातळ्यांवर पालिकेने यश मिळवले आहे.''

Edited By :  Siddharth Latkar
 

loading image
go to top