संस्थानच्या मदतीला स्वतः अध्यक्षच धावले; तीन लाखांची दिली देणगी

संस्थानच्या मदतीला स्वतः अध्यक्षच धावले; तीन लाखांची दिली देणगी
Updated on: 

सातारा : "कोरोना'च्या संचारबंदीमुळे देवस्थान भक्तांसाठी बंद असल्याने सज्जनगड संस्थानही अडचणीत आले असून, संस्थानच्या मदतीकरिता संस्थानचे अध्यक्ष सु. ग. तथा बाळासाहेब स्वामी आणि वैजयंती स्वामी यांनी नुकतीच तीन लाख रुपयांची देणगी दिली आहे.
शाब्बास..! बॅंड वादकाची अशीही जिद्द
 
"कोरोना'च्या संचारबंदीमुळे राज्यातील सर्व देवस्थाने भक्तांसाठी 22 मार्चपासून बंद ठेवण्यात आली आहेत. सज्जनगडावरही श्रीराम मंदिर आंणि समर्थ समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे देणग्यांचा ओघही थांबला आहे. मात्र, दैनंदिन खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार करावे लागत आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या संस्थानच्या मदतीला स्वतः अध्यक्षच धावले असून, श्री. व सौ. स्वामी यांनी तीन लाख रुपयांची देणगी दिली असल्याची माहिती सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थानच्या वतीने देण्यात आली.
संपादन - संजय शिंदे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli District Bank Election
Panchayat Samiti members discuss drought conditions and irrigation issues in Walwa taluka
Khambatki Ghat Traffic Jam on Pune-Satara Highway
Satara Munawale Water Tourism Centre Reopens With Adventure Sports And Modern Freshwater Tourism Facilities
Marathi News Esakal
www.esakal.com