Satara Crime : मोळाचा ओढा परिसरात एकावर तलवार हल्ला: तीन अनोळखी व्यक्तींचे कृत्य; गुन्हा दाखल
दत्तात्रय पवार हे शाहूपुरी चौकातून मोळाचा ओढा परिसराच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. या वेळी दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आले. त्यातील एकाने त्यांच्या मांडीवर तलवारीने वार केला.
A violent sword attack took place in Molaacha Oddha, leaving the community in shock. Police have filed a case and are actively investigating the crime.Sakal
सातारा : येथील मोळाचा ओढा परिसरात तलवारीने वार करून एकाला जखमी केल्याप्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबात तनुजा दत्तात्रय पवार (रा. जयहिंद कॉलनीजवळ, शाहूपुरी) यांनी फिर्याद दिली आहे.