esakal | गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात वर्षापुर्वी दारूबंदीसाठी झाले मतदान; निकाल गुलदस्त्यात

बोलून बातमी शोधा

गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात वर्षापुर्वी दारूबंदीसाठी झाले मतदान; निकाल गुलदस्त्यात}

या आंदोलनात सिताई फाउंडेशनच्या कविता कचरे, सुजाता ताईगडे, सुमन ताईगडे, संगीता ताईगडे, शालन ताईगडे, रूपाली ताईगडे, इंदुताई शिबे, मालन ताईगडे, सुमन ताईगडे व महिला सहभागी झाल्या होत्या.

गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात वर्षापुर्वी दारूबंदीसाठी झाले मतदान; निकाल गुलदस्त्यात
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : पाटण तालुक्‍यातील ताईगडेवाडी येथील देशीदारूचे दुकान बंद करण्यासाठी घेतलेल्या मतदानाचा निकाल जाहीर करावा, या मागणीसाठी तेथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत निदर्शने केली. याबाबतचे निवेदन महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले असून, त्यात आगामी काळात मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. 

ताईगडेवाडी येथील दारूचे दुकान बंद करण्यासाठी सुमारे एक वर्षापूर्वी मतदान प्रक्रिया घेण्यात आली होती. मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या घटनेला एक वर्षे झाले, तरी त्याचा निकाल प्रशासनाने जाहीर केला नाही. यामुळे गावात अजूनही उभी बाटली असून, त्याचा त्रास सर्वसामान्य कष्टकरी जनतेला सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही योग्य ती कार्यवाही झाली नाही. यामुळे ताईगडेवाडी येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता.
 
यानुसार आंदोलन करत महिलांनी प्रशासनाचा निषेध केला. याचे निवेदन महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे. यात प्रशासनाच्या भूमिकेविषयी शंका व्यक्‍त करण्यात आली आहे. या आंदोलनात सिताई फाउंडेशनच्या कविता कचरे, सुजाता ताईगडे, सुमन ताईगडे, संगीता ताईगडे, शालन ताईगडे, रूपाली ताईगडे, इंदुताई शिबे, मालन ताईगडे, सुमन ताईगडे व महिला सहभागी झाल्या होत्या. 

घरा घरांत मना मनांत पक्षाला पाेचविणा-या नेत्यावरच झाली गेम 

विदयार्थीनीला विश्वासात घेऊन महाबळेश्वर पाेलिसांनी शाेधला बलात्कारी

Mahashivratri 2021 : वासोटा मार्गे नागेश्वरला निघालात? थांबा! त्यापुर्वी हे वाचा 

खाकीच्या डाेळ्यातून ओघळले अश्रु; आईसह मुलगा जळून खाक

अंतर्गत कुरबुरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार पडणार