सातारा पालिकेतील लाचखोरांवर कठोर कारवाई करा : माधवी कदम

Satara Mayor Madhavi Kadam
Satara Mayor Madhavi Kadam
Updated on

सातारा : सातारा पालिकेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांना लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. नगरपरिषद संचालनालयाकडून थेट नियुक्ती झालेल्या संचित धुमाळला कायद्याच्या आधारे कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे मत साताऱ्याच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांनी व्यक्‍त केले आहे. 

दरम्यान, एक आंबा नासका निघाला म्हणून आपण सर्वच आंबे फेकून देत नाही. म्हणूनच एकाच्या कुकर्माचा न्याय अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांना लावून सर्व जण एका माळेचे मणी असे समजून चालणार नाही. या प्रकारामुळे नगरपरिषदेच्या प्रशासनाचे खच्चीकरण होवून त्याचा विपरित परिणाम नागरी सुविधांवर होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
 
काल झालेल्या सातारा पालिकेतील लाचलुचपत विभागाच्या कारवाईनंतर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी आपली भुमिका प्रसिध्दी पत्रकातून स्पष्ट केली. त्यात म्हटले की, सातारा विकास आघाडीच्या सत्तेच्या काळात खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतत्वाखाली गेल्या आठ ते दहा वर्षात ग्रेडसेपरेटर, कास धरण उंची, नवीन कास पाईपलाईन, भुयारी गटर योजना, घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, आयडीएसएमटी, युआयडीएसएसएमटी असे कोट्यवधी रुपयांचे मोठे प्रकल्प नागरीकांचे हित लक्षात घेवून मार्गी लावण्यात आले आहेत. 

शहरातील गल्ली बोळात, विद्युतीकरण, कॉक्रीटरोड, गटर्स, रस्ते आदी दैनंदिन विकास कामे तर गरजेनुसार प्राधान्याने हाताळण्यात आली आहेत. पण, नगरपरिषद संचालनालयाकडून थेट नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांना त्यांचे गाव सोडून नियुक्‍त्या मिळाल्याने त्यांना सामाजिक बांधिलकी, शहराविषयीची आत्मियता कमी असते. त्यामुळेच संचित धुमाळांसारखा एखादा अधिकारी, मनाची आणि जनाची लाज सोडून वागल्यावर असे परिणाम दिसू शकतात. 

जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. परंतु कोणाही निष्पाप व्यक्तीवर अन्याय सुध्दा होणार नाही, याचीही खबरदारी घेतली गेली पाहिजे. या प्रकाराचे भांडवल करून काहीजण नगरपरिषेदवर कोणाचा वचक राहीला नाही, टिकाटिपणी काही व्यक्ती संधीचा लाभ उठवण्याच्या हेतून करणार हे निश्‍चित आहे. काल जे काही घडले ते अक्षम्य आहे, असेही सौ. कदम यांनी स्पष्ट केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com