
आरडगाव : सध्या सर्वत्र ग्रामदैवतांच्या यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू आहे. गावची जत्रा म्हटलं, की डोळ्यासमोर येतो तमाशा आणि तमाशा ठरवायचा म्हटलं, की पावलं वळतात ती मुक्काम पोस्ट काळजकडे.. फलटण तालुक्यातील काळज हे तमाशा फडमालकांचं माहेर. पाडव्याच्या मुहुर्तावर काळज येथील राहुट्यांमध्ये ३५० हून अधिक फडमालकांनी गावच्या जत्रेच्या सुपाऱ्या घेतल्या आहेत.