
खंडाळा : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव येथे टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातात टँकरचालक जागीच ठार झाला, तर सोबत प्रवास करणारे दोघे जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. प्रवीण राजाराम शिंगटे (वय ३९, रा. गोटखिंड, ता. वाळवा, जि. सांगली) असे मृत झालेल्या टॅंकर चालकाचे नाव आहे.