Tapola-Ahir Cable-Stayed Bridge
esakal
कास : कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातील नदीपात्रात तापोळा- आहिरदरम्यान उभारलेल्या अत्याधुनिक केबल स्टे ब्रीजचे काम ९५ टक्के पूर्ण झाले (Tapola-Ahir Bridge) आहे. पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नसला, तरी गणेशोत्सव काळात लोकांची गैरसोय लक्षात घेऊन रविवारपासून (ता. १३) २० सप्टेंबरपर्यंतच हा पूल खुला राहील, असे कंपनीने सांगितले आहे.