शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि वेणूताई चव्हाण कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला आहे
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलनsakal
Updated on

कऱ्हाड : यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि वेणूताई चव्हाण कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला आहे. तिसऱ्या दिवशी या संपामध्ये कर्मचारी सहभागी झाले असून, त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. संपावर तोडगा न निघाल्यास कामकाज ठप्प झाले असून, त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाज व प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांवर होत आहे.

महाराष्ट्र राज्य अशासकीय विद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऑफिसर्स फोरम, महाराष्ट्र राज्य अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन रजिस्टार असोसिएशन व आयटक संलग्न सोलापूर विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने राज्यभर काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
पत्नीला तोंडी तलाक देवून घरातून बाहेर काढणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करा

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संघटनांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर गेल्या वर्षी कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कुठल्याही समस्येवर राज्य सरकारने तोडगा काढला नाही. केवळ संघटनेने संघटनांचा वेळ मारून नेण्याची भूमिका ठेवल्यामुळे विद्यापीठ, तसेच महाविद्यालयीन कर्मचारी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावर एकत्र येऊन काम बंद आंदोलन सुरू केले. संघटन शक्तीचे प्रदर्शन घडवित मागण्या मंजूर झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्र महासंघ प्रतिनिधी नारायण मोरे, कोल्हापूर विभागीय महाविद्यालयीन संघटक सतीश डोंगरे, रवी पवार, विजय साळुंखे, गणेश पांढरपट्टे, श्रीमती बागल, श्रीमती देसाई, श्रीमती भोज, श्रीमती थोरवडे यांच्यासह दोन्ही महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांनी संपामध्ये भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam low water level news
Satara Witnesses Unusual Shiv Sena Protest Over Price Rise and Fuel Hike
Electric Shock Claims Life of Farmer During Pump Installation in Satara District
Political Ideology: RSP Chief Mahadev Jankar Reaffirms Commitment to Shahu-Phule-Ambedkar Legacy
Marathi News Esakal
www.esakal.com