दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहनात्मक गुण दिले जातात. त्यासाठी यापूर्वी शाळा, महाविद्यालयांकडून ऑफलाइन प्रस्ताव दाखल केले जात असे.
- सिद्धार्थ लाटकर
सातारा : इयत्ता दहावी, बारावीतील खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनात्मक गुणांचे (ग्रेस गुण) प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने सादर करताना शाळांसह खेळाडूंना पोर्टलमधील त्रुटींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने १८ वर्षांखालील खेळाडूंची नोंदच होत नसल्याने गुण मिळणार की नाही या चिंतेत खेळाडू, पालकांसह क्रीडा शिक्षकांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, जे खेळाडू विद्यार्थी क्लबकडून थेट राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभगी झाले असतील, ते खेळाडू क्रीडा गुणास पात्र असणार नाहीत, असे क्रीडा विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.