
कऱ्हाड : टेंभू उपसा सिंचन योजनेत बाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासह सुविधा देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सेवा हमी, दप्तर दिरंगाईसह संबंधित भूसंपादनाचा खासगी वाटाघाटी व अन्य कायद्याप्रमाणे निलंबन, बडतर्फची कार्यवाही करावी, या मागणीसाठी टेंभू प्रकल्पाच्या भिंतीवर (बराजवर) आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी बेमुदत उपोषणास बसले आहेत. संघटनेचे तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे.