

उंडाळे : कऱ्हाड- चांदोली मार्गावरील जिंती नाक्यावर शनिवारी रात्री भाजीपाला घेऊन जाणाऱ्या टेंपोने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. सुरेश हरिबा धाईंगडे (वय ४१) असे अपघातातील मृताचे नाव आहे. ते येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्थेत नोकरीस होते. शनिवारी साडेनऊ वाजता कऱ्हाडहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या टेंपोने धडक दिली.