सातारा : दहा बाधितांचा मृत्यू, कोरेगाव तालुक्यातील सर्वाधिक

सिद्धार्थ लाटकर
Monday, 12 October 2020

सातारा जिल्ह्यात एक लाख 63 हजार 114 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये  41 हजार 834 नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी 33 हजार 533   नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एक हजार 374 नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या सहा हजार 927 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेताहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 10 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या रहिमतपूर ता. कोरेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, वेण्णानगर ता. सातारा येथील 83 वर्षीय महिला, नेर ता. खटाव येथील 55 वर्षीय महिला, पाल. ता. कराड येथील 83 वर्षीय महिला, निनाम पाडळी ता. सातारा येथील 73 पुरुष, भोसरे ता. खटाव येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील समृद्धी शेडगेची 'इस्त्रो'त चमक 

याबराेबरच वाघजाईवाडी ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये कोरेगाव येथील 88 वर्षीय पुरुष, खेड नांदगिरी ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुष तर रात्री उशिरा कळविलेले कळमवाडी ता. वाळवा जि. सांगली येथील 55 वर्षीय पुरुष अशा 10 एकूण कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

सातारा : सहा हजार 927 कोरोनाबाधित घेताहेत उपचार

घेतलेले एकूण नमुने 163114

एकूण बाधित 41834

घरी सोडण्यात आलेले 33533

मृत्यू 1374

उपचारार्थ रुग्ण 6927


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten Covid 19 Passes Away Citizens Satara News