सैदापुरात 100 टक्के लॉकडाउन; सर्वपक्षीय नेते एकवटले

सचिन शिंदे
Friday, 18 September 2020

सैदापूर परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. ती साखळी तोडण्यासाठी आठवडाभर लॉकडाउन पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार त्याला प्रतिसाद मिळाला आहे. परिसरातील सर्व सहकारी संस्था, बॅंका, पतसंस्था, खासगी संस्थांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी घेतला आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सैदापूर येथे आजपासून सलग दहा दिवस पुकारलेल्या लॉकडाउनला 100 टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावश्‍यक सेवेतील व्यवहारांपैकी औषध दुकाने सुरू होती. दुधासाठी सकाळी दोन तासांचा वेळ देण्यात आला आहे. 

व्यवहार सुरू ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही सर्वपक्षीयांनी दिला आहे. त्यामुळे सौदापूर, विद्यानगर भागात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. कोरोनाची साखळी तोडण्यसाठी ग्रामस्थ व सर्व पक्षांतर्फे आजपासून पुढच्या गुरुवारअखेर (ता. 24) लॉकडाउन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आजपासून बंद पाळण्यात आला आहे. त्यात सैदापूर व विद्यानगर परिसरातील ग्रामस्थ, सर्व व्यापारी, सर्व दुकानदार, हॉटेल, स्नॅक सेंटर, चहाची टपरी, भाजी विक्रेते, फिरते व्यावसायिक सहभागी झाले आहेत. त्यानुसार बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. 

लोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलंच असतं : उदयनराजे गरजले

सैदापूर परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. ती साखळी तोडण्यासाठी आठवडाभर लॉकडाउन पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार त्याला प्रतिसाद मिळाला आहे. परिसरातील सर्व सहकारी संस्था, बॅंका, पतसंस्था, खासगी संस्थांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी घेतला आहे. त्यात सहभागी होण्याचे त्यांना आवाहन केले होते. दरम्यान, अत्यावश्‍यक सेवेतील मेडिकल दुकाने 24 तास सुरू राहणार आहेत. दूधविक्री करणारी सर्व दुकाने सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत चालू राहतील. ग्रामस्थांनी अत्यावश्‍यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन करण्यास सर्व पक्षीय नेते एकवटले आहेत. बंदच्या कालावधीत दुकाने सुरू असल्यास दंडात्मक कारवाईचाही इशाराही देण्यात आला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten Days Lockdown At Saidapur Satara News