
कोणत्या रोगाने या कोंबड्या मृत झाले आहेत याची तपासणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कुडाळ/दहिवडी (जि. सातारा) : जावळी तालुक्यातील कुडाळ येथील शेख वाड्यामध्ये दहा कोंबड्या मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत. त्यामुळे कुडाळसह जावळी तालुक्यातील शेतकरी आणि पशूपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जावळी तालुक्यातील कुडाळ येथील एक वाड्यांमधील असणाऱ्या देशी कोंबड्यांच्या खुराडामधील दहा कोंबड्या एकाच वेळी मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत. याबाबत अनेक शंका-कुशंका निर्माण होत असल्या तरी ज्या शेडमध्ये कोंबड्या ठेवलेल्या होत्या अचानक दहा ते बारा कोंबड्या मृतावस्थेत सापडल्याने कुडाळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या बर्ड प्लूची सर्वत्र भीती असल्याने कोंबड्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी आता कुडाळ येथे पशुवैद्यकीय विभागाने तात्काळ ठाेस पावले उचलावीत. मृत्यू झालेल्या कोंबड्याची तपासणी करून कोणत्या रोगाने या कोंबड्या मृत झाले आहेत याची तपासणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर माणमध्ये कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने प्रशासनाची धावपळ उडाली हाेती. प्रशासनाने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी प्रशासनाच्या बैठका घेतल्या हाेत्या. आज (गुरुवार) माणमधील मृत काेंबड्यांचा बर्ड फ्लू नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
विजयाचा जल्लाेष पडला महागात; भाऊंना चढावी लागली पाेलिस ठाण्याची पायरी
Bird Flu | कोरोनामुळे बर्ड फ्लू आजाराशी लढणे होणार सोपे, तज्ज्ञांचे मत
साता-यात बर्ड फ्लू; तीन महिने काेंबडी, चिकन, अंडी विक्रीवर बंदी
Edited By : Siddharth Latkar