Mahabaleshwar News : प्रशासनाने जेसीबीद्वारे थापा पॉइंटवरील अतिक्रमण हटवले
प्रशासन त्वरित ॲक्शन मोडवर आले असून, शनिवारी पहाटे दांडेघर गावची यात्रा असतानाच प्रशासन पाच जेसीबी, दोन क्रेन घेऊन जागेवर पोचले. अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. या ठिकाणावरील सर्व पत्र्यांचे शेड, बांधकामे पडण्यात आली. महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसे : दांडेघर (ता. महाबळेश्वर) येथील हॅरिसन्स फॉली (थापा) पॉइंटवरील अतिक्रमण तालुका प्रशासनाने जेसीबीद्वारे हटवले आहे. प्रशासनाच्या या कारवाईचे ग्रामस्थांनी फटाके वाजवून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.