महसूल-कृषी कडून होणार ई-पीक पाहणी

महसूल-कृषी कडून होणार ई-पीक पाहणी
Updated on
Summary

ई-पीक पाहणीचे काम महसूल विभागानेच आत्तापर्यंत केले आहे.

कऱ्हाड (सातारा): ई-पीक पाहणीचे काम महसूल विभागानेच आत्तापर्यंत केले आहे. यापुढे आता महसूल आणि कृषी विभागाने ते काम संयुक्तपणे करावे, असे मुंबईत महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरवण्यात आल्याची माहिती राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी आज दिली.

महसूल-कृषी कडून होणार ई-पीक पाहणी
आशादायक : कऱ्हाड झाले कोरोनामुक्त

मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहामध्ये झालेल्या बैठकीस महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, कृषी सचीव एकनाथ डवले, जमाबंदी आयुक्त सुधांशू, कृषी आयुक्त धीरज कुमार, राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष श्री. डुबल, तहसिलदार संघटनेचे अध्यक्ष श्री. बगळे, रत्नागिरी-सिधुंदूर्ग जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष दिलीप देसाई, उपाध्यक्ष गौसमहंमद लांडगे, अप्पर चिटणीस अशोक दुधसागरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष अगिवले यांच्यासह महसूल, तलाठी, कृषी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. डुबल म्हणाले, महसुलमंत्री व कृषी मंत्री यांनी बैठकीत किसान योजनेचे तलाठी यांनी काम केल्याचे कृषी विभागाचे सर्व पदाधिकारी व अधिकारी यांनी मान्य केले. चुकीची माहिती असल्यामुळे सुमारे आठ लाख खातेदार शिल्लक आहेत. ते महसूल व कृषी विभागाने वाटप केल्याप्रमाणे दिलेल्या गावांचे काम करून माहे नोव्हेंबर २०२१ अखेर सर्व काम पूर्ण करावे.

महसूल-कृषी कडून होणार ई-पीक पाहणी
नांदलापुरला 15 दगडखाणी सील! कऱ्हाड तहसीलदारांच्या कारवाईचा धडाका

कृषी व महसूल दोन्ही विभागाची संयुक्त बैठक घेऊन सर्व डाटा कृषी विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे बैठकीत मान्य करण्यात आले. तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष श्री. बगळे व उपाध्यक्ष श्री. कुंभार यांनी पीएम किसानचे संपूर्ण काम रात्रंदिवस तलाठी व मंडलाधिकारी यांनी केल्याचे मान्य केले. ई पीक पाहणीचे काम शासन निर्णयाप्रमाणे करण्याचे बिनशर्त मान्य करण्यात आले. दोन्ही मंत्र्यांनी ई पीक पाहणीचे काम दोन्ही संवर्गाने संयुक्तपणे करावे, असे आदेश दिले. सातबारा आणि आठ अ उताऱ्याचे वितरण शासनाने स्व खर्चाने उपलब्ध करून द्यायाच्या आहेत. दोन ऑक्टोबरपासून सातबारा आणि आठ अ खातेदारांना वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी वेळ लागणार असल्याचे मंत्र्यांनी मान्य केले. तलाठी व मंडलाधिकारी यांना मासिक वेतन वेळेवर मिळावे, फिफो कार्यप्रणालीचा अवलंब करावा, अशीही मागणी केल्याचे श्री. डुबल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam low water level news
Satara Witnesses Unusual Shiv Sena Protest Over Price Rise and Fuel Hike
Electric Shock Claims Life of Farmer During Pump Installation in Satara District
Political Ideology: RSP Chief Mahadev Jankar Reaffirms Commitment to Shahu-Phule-Ambedkar Legacy
Marathi News Esakal
www.esakal.com