esakal | मसूर विभाग पुन्हा हॉटस्पॉट; 23 गावात कोरोनाचा फैलाव
sakal

बोलून बातमी शोधा

 Coronavirus

मसूर (सातारा) विभागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालल्याने मसूरसह विभाग पुन्हा हॉस्पॉट बनला आहे.

मसूर विभाग पुन्हा हॉटस्पॉट; 23 गावात कोरोनाचा फैलाव

sakal_logo
By
गजानन गिरी

मसूर (सातारा) : विभागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालल्याने मसूरसह विभाग पुन्हा हॉस्पॉट बनला आहे. केवळ मसूरमधीलच रुग्णांनी शंभरी गाठली आहे. त्यातील तब्बल 70 रुग्ण होम क्वारंटाईन (Home Quarantine) झाले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत (Masur Primary Health Center) 23 गावात एकूण 165 रुग्ण आहेत. येथे मोठा विलगीकरण कक्ष उभारूनही तो केवळ शोपीस बनला आहे. नागरिकांचाही बेफिकीरपणा वाढला आहे. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. बाजारपेठेतील गर्दी कोरोनाला आणखी आमंत्रण देत आहे. बहुतांशी लोक मास्क हनुवटी वरच ठेवत आहेत. नियमांचे उल्लंघन करीत नियम धाब्यावरच आहेत. दुचाकी सुसाट आहेत. अनेकजण अद्यापही आजार अंगावरच काढताहेत अशी स्थिती आहे. (The Masur Division Again Became The Hotspot Center Of Coronavirus bam92)

कोरोना रुग्णांची सर्व सोयींनी युक्त व्यवस्था घरी असेल याची खात्री देता येत नसल्याने शासनाने दखल घेत होम क्वारंटाईन पद्धत बंद करून प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या ठिकाणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांच्या हस्ते मान्यवरांच्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विलगीकरण कक्षाचे उद्घाटन झाले. कक्ष उभारूनही प्रत्यक्षात मात्र रुग्णांनी घरीच राहणे पसंत केल्याचे आशा स्वयंसेविकेंच्या सर्व्हेतून आढळून आले आहे. टेस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि उपचार मात्र खाजगी दवाखान्यात अशी स्थिती आहे. घरातील कुटुंबातच रुग्ण वाढत आहेत, तर काही बाधित रुग्ण सर्रास फिरत आहेत. त्यामुळे रुग्ण वाढीचा धोका कायम आहे.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आमदारांनी लक्ष घालावं

रुग्ण विलगीकरण कक्ष व कोविड सेंटरऐवजी घरीच राहत असल्याने धोका वाढला आहे. सुरक्षिततेसाठी संबंधितांची अगोदर रॅपिड टेस्ट, मगच लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

-डॉ. रमेश लोखंडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र मसूर

loading image