esakal | ऐतिहासिक किल्ले धोक्यात; शिवरायांच्या विचारांना तिलांजली देण्याचा प्रयत्न!
sakal

बोलून बातमी शोधा

Sadashivgad Fort

गडकोटांचे महत्त्व दुर्गमतेत असून रस्ते करून ती नष्ट केली जात आहे. यामुळे गडाचे गडपण हरवणार आहे.

ऐतिहासिक किल्ले धोक्यात; शिवरायांच्या विचारांना तिलांजली देण्याचा प्रयत्न!

sakal_logo
By
सचिन शिंदे, हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : येथील ऐतिहासिक किल्ले (Historic Fort) सदाशिवगडची (Sadashivgad Fort) नियोजित रस्त्यामुळे गडावरील मंदिरांसह वास्तूही धोक्यात येणार आहेत. भविष्यात अतिक्रमणांसह अन्य अनावश्यक गोष्टी रोखणे अशक्य होते. रस्ते झालेल्या अन्य किल्ल्यांवरील अनुभव चांगला नाही. त्यामुळेच सदागडावरील रस्ता प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या दुर्ग संवर्धनात काम करणाऱ्या संस्थांनी पत्रकार परिषदेत केली. (The Poor Condition Of The Historical Forts At Karad bam92)

जिल्ह्यातील गडकोटांवर संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सदाशिवगडावरील रस्त्यास विरोध केला. किल्ले सदाशिवगडावर आजही आबालवृद्ध पायी जातात. बाबरमाची, वनवासमाचीहूनही गडावर येतात. गड परिसरात वन विभागाची हद्द आहे. सदाशिवगड ते किल्ले मच्छिंद्रगड अशी सह्याद्रीची डोंगररांग (Sahyadri Mountain) आहे. सागरेश्वर अभयारण्य आहे. परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. हरिण, काळविटासारखे वन्यप्राणी सदाशिवगड परिसरात दिसतात. अशी स्थिती असताना तेथे रस्ताचा घाट घातला जातो आहे. गडावर रस्ता करणे चुकीचे आहे.

हेही वाचा: प्रतापगड सुरू न झाल्यास टाळे तोडू; आमदार शिंदेंचा गर्भित इशारा

गडकोटांचे महत्त्व दुर्गमतेत आहे. रस्ते करून ती नष्ट केली जात आहे. गडाचे गडपण हरवणार आहे. पुस्तकात दाखवण्यासाठी किल्ले शिल्लक राहतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना एक प्रकारे तिलांजली देण्याचाच हा प्रकार आहे. शासनाने तेथे रस्त्याचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा. या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास प्रसंगी आंदोलन उभारले जाईल. पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांच्याकडे विषयावर २२ दुर्ग संस्थांचे प्रतिनिधी भेट घेणार आहेत. त्यात त्यांचे सहकार्य करण्याची विनंती करणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री, वनमंत्री, पर्यटनमंत्री (Minister of Tourism) यांची भेट घेत राज्यातील कोणत्याही गटकोटावर रस्ता अथवा रोप वे होऊ नये, अशी मागणी करत तसा स्वतंत्र कायदा करावा, अशी आग्रही मागणी राज्यातील सर्व दुर्ग संवर्धन संस्थांच्या माध्यमातून केली जाणार आहे.

हेही वाचा: 'शरद पवार-नरेंद्र मोदींच्या भेटीत काय शिजलंय, काय माहित?'

सदाशिवगडासाठी एकवटलेल्या संस्था...

टीम सदाशिवगडसह दुर्गसेवक, टीम वसंतगड, टीम दातेगड, टीम गुणवंतगड, सह्याद्री प्रतिष्ठान, राजधानी सातारा, गडकोट-ध्यास संवर्धनाचा संस्था (सुंदगरगड), स्वराज्यरक्षक संभाजीराजे प्रतिष्ठान, श्री वंदनेश्वर प्रतिष्ठान, शिवसह्याद्री संस्था, राजा शिवछत्रपती परिवार, राजाज्ञा, भटकंती वाई परिवाराची, शिवसंकल्प परिवार, दातेगड संवर्धन समिती, शिवराय ट्रेकिंग ग्रुप, राजे प्रतिष्ठान, रायगड परिवार, शिवदुर्गेश्वर वर्धनगड, टीम पावनगड, शंभूराजे ग्रुप महिमानगड, वैराटेश्वर प्रतिष्ठान, राजधानी प्रतिष्ठान या संस्थांच्या प्रतिनिधींनी सदाशिवगडासाठी पत्रकारांशी संवाद साधला.

The Poor Condition Of The Historical Forts At Karad bam92

loading image