esakal | दक्षिण भागातील सांगवी-मेढा मार्गावरील रस्ता खचला
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा: दक्षिण भागातील सांगवी-मेढा मार्गावरील रस्ता खचला

सातारा: दक्षिण भागातील सांगवी-मेढा मार्गावरील रस्ता खचला

sakal_logo
By
सुर्यकांत पवार

कास (सातारा) : मेढा दक्षिण विभागातील दुर्गम भागात वसलेल्या सांगवी, मेढा व घरातघर या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा ओढ्याजवळील भाग खचल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला असून सांगवी ता. मेढा व घरातघर या दोन गावांचा संपर्क तुटणार आहे. ज्या ठिकाणी भिंत खचली आहे त्याच्या बाजूला वरती थोडासाच रस्ता शिल्लक राहिला आहे. या ठिकाणाहून अवजड वाहन गेल्यास उरलेला रस्ता ही बंद होण्याचा धोका असल्याने दोन गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ठाकरे सरकारसह मोदींकडून FRP चे तुकडे करण्याचा कुटिल डाव

चार दिवसांपासून या भागात जोरदार अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीमुळे ओढ्याना जोरदार पाणी आले आहे. मेढा कुसुंबी सातारा या मुख्य रस्त्यावरील गांजे गावापासून साधारणतः दीड किलोमीटर अंतरावर सांगवी त. मेढा व घरातघर ही दोन गावे डोंगराच्या कुशीत वसलेली आहेत. या गावांना ईतर गावांशी जोडणारा हा एकमेव मुख्य मार्ग आहे. गांजे गावच्या ओढ्यालगतून हा मार्ग जातो.

अर्धा किलोमीटर रस्ता हा ओढ्यातूनच गेला आहे. त्यामुळे ओढ्याच्या एका बाजूला संरक्षक भिंत बांधून रस्ता करण्यात आला आहे. खूप वर्षांपूर्वी ही भिंत बांधण्यात आली आहे. या रस्त्याच्या वरच्या बाजूचा नाला पूर्ण भरल्याने पाणी रस्त्यावर येवून रस्त्याचा भराव खचला. त्यामुळे संरक्षक भिंत ढासळली.

सांगवी, मेढा व घरातघर ही गावे छोटीशी आहेत. या गावांमध्ये रस्ता व ईतर अत्यावश्यक सुविधांच्या बाबतीत प्रशासनाचे आणि पदाधिकारी यांचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. दोन्ही गावांकडे जाणार्या रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. सांगवी मेढा गावच्या ओढ्यावरील फरशी पूल ही धोकादायक झाला आहे. तरी शासनाने याकडे लक्ष देवून या रस्त्याच्या संरक्षक भिंतीबरोबरच डांबरी रस्त्याचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

loading image
go to top