
कऱ्हाड : आरोग्य विभागाचा कणा असलेल्या आशा स्वयंसेविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गटप्रवर्तकांची नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या या गटप्रवर्तकांना कामाच्या मोबदल्यात तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. त्याचा विचार करून राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये गट प्रवर्तकांच्या मानधनात चार हजार रुपयांची वाढ करण्याचा अध्यादेश काढला.