..अखेर विरळीनं कोरोनाला गावच्या वेशीवरच रोखलं; एकजुटीच्या लढ्याला यश

Coronavirus
Coronavirusesakal

कुकुडवाड (सातारा) : विरळी (ता. माण) येथील वाढती कोरोना रुग्णसंख्या (Corona patient) थोपवण्यासाठी सरपंच आणि ग्रामस्थांनी सुरू केलेल्या विलगीकरण कक्षाला चांगले यश मिळाले. प्रशासनाचे मार्गदर्शन व ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आठ दिवसांपासून गाव कोरोनामुक्त करण्यात यश मिळवले आहे. विरळीसारख्या डोंगरकपारीत असणाऱ्या लहानशा गावात कोरोनामुळे (Coronavirus) दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर गावातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरपंचांसह ग्रामस्थांनी (Virali Gram Panchayat) आणि जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या (Department of Health) सूचनेनुसार कोरोनाला हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. (The Virali Village Is Became Free From Coronavirus Satara Marathi News)

Summary

विरळी (ता. माण) येथील वाढती कोरोना रुग्णसंख्या थोपवण्यासाठी सरपंच आणि ग्रामस्थांनी सुरू केलेल्या विलगीकरण कक्षाला चांगले यश मिळाले आहे.

'माझे गाव माझे कुटुंब' अशी संकल्पना (My Village My Family Concept) करून गावातील प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला. ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील हायस्कूलमध्ये सुसज्ज असा ३० बेडचा विलगीकरण कक्ष सुरू केला. त्यामध्ये रुग्णांच्या औषध, गोळ्या, रक्ताच्या तपासण्या, चहा, नाश्ता आणि जेवणाचा खर्च मोफत करण्यात आला. या सेंटरमधून एकूण २० रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले. बाहेर उपचार घेणाऱ्या रुग्णांना वर्गणी काढून मदत केली. गावात सातत्याने फवारणी केल्याने आणि ग्रामस्थांनी शासनाच्या सूचना आणि नियमांचे पालन करून मागील आठ दिवसांपासून गाव कोरोनामुक्त करण्यात यश मिळवले आहे.

Coronavirus
48 तासांत उभारला 'ऑक्सिजन प्रकल्प' अन् 'सोना'ने वाचवले अनेकांचे प्राण

प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर, डॉ. सावंत, डॉ. प्रशांत घुटुकडे, डॉ. खरजे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच गोरड, ग्रामसेवक श्री. गंबरे, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य सेवक श्री. रणपिसे, आरोग्य सेविका राणी काळेल, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, युवकांनी कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न केले. कोरोनामुक्तीसाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले. सर्व ग्रामस्थांनी एकजूट दाखवून सहकार्याची भूमिका ठेवली, असे सरपंच श्री. गोरड यांनी सांगितले.

The Virali Village Is Became Free From Coronavirus Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com