अरेच्या! चक्क क्रॉस ग्रेहाऊंड जातीच्या कुत्रीची चोरी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 February 2021

सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये चाेरीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान आता तर चाेरांनी जनावरांची चाेरी करण्यास प्रारंभ केल्याने नागरिकांसह ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

विसापूर (जि. साताारा)  : पुसेगाव येथील प्रगतशील शेतकरी विकास मानसिंग जाधव यांची क्रॉस ग्रेहाऊंड जातीची पाळीव कुत्री चोरीला गेल्याने खळबळ उडाली. पुसेगाव पोलिस ठाण्यात याची तक्रार देण्यात आली असून, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काशिवाडा परिसरात विकास जाधव यांचा जनावरांचा गोठा आहे. सोमवारी (ता. 15) रात्री आठच्या सुमारास गोठ्यावर कोणीही उपस्थित नसल्याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने या कुत्रीला चोरून नेले. 

कोरेगाव : येथील लक्ष्मीनगरमध्ये एका महिलेने आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास राहत्या घराच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिका मनोज टाक (वय 19 वर्षे, रा. लक्ष्मीनगर, कोरेगाव) असे या महिलेचे नाव आहे. यासंदर्भात मनोज राजन टाक (रा. लक्ष्मीनगर, कोरेगाव) यांनी फिर्याद दिली असून, पोलिस नाईक साळुंखे तपास करत आहेत. 

खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावरील येथील जुना टोलनाक्‍याजवळ एक जण रात्री गंभीर जखमी बेशुध्द अवस्थेत आढळला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती खंडाळा पोलिस ठाण्याचे महिला पोलिस उपनिरीक्षक स्वाती पवार यांनी दिली. पोलिसांनी सांगितले, की या जखमीस येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारास हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. पांढरे केस व दाढी व अंगात निळसर शर्ट, खाकी पॅन्ट असलेल्या या अज्ञात पुरुषाविषयी माहिती आढळल्यास पोलिसांशी तत्काळ संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक स्वाती पवार करीत आहेत.

ज्या माणसाने स्वतःच्या दोन बॅंका विकल्या, पाच संस्था मोडीत काढल्या ते राष्ट्रवादीत नकोत

CoronaUpdate : वाढती रुग्णसंख्या राेखण्यासाठी आठवडा बाजार रद्द; प्रांताधिकाऱ्यांचे उपायाचे निर्देश

Feeling Proud : जवान गौरव ससाणेंनी दोन अतिरेक्‍यांना धाडले यमसदनी

मोदीजी, 70 वर्षांत कॉंग्रेसनं काहीच नाही केलं; मग तुम्ही 7 वर्षांत काय केलं?; माजी मुख्यमंत्र्यांचा टोला

शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी! चॉकलेटपेक्षाही स्वस्त झालाय कोबी

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft Of Cross Grey Hound Dog Satara Crime News