महाबळेश्वर : भर बाजारपेठेतील एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न

अभिजीत खूरासणे
Wednesday, 25 November 2020

दरम्यान हे एटीएम मशीन त्यांना फुटले नाही. या घटनेची माहिती समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुढील तपास सुरु आहे.

महाबळेश्वर : महाबळेश्वर बाजारपेठेतील बॅंक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुख्य बाजारपेठेच्या प्रवेशद्वार असलेल्या सुभाषचंद्र बोस चौकातील मॉलमध्ये ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मंगळवारी मध्यरात्री लोखंडी ग्रील कापून अज्ञातांनी प्रवेश केला असा संशय व्यक्त केला जात आहे. ज्या ज्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत ते कॅमेरे फिरवल्याचे लक्षात येत आहे.

महाबळेश्वर, पांचगणीतील गर्दी सर्वांना अडचणीत आणू शकते; आरोग्यमंत्र्यांची खंत 

दरम्यान हे एटीएम मशीन त्यांना फुटले नाही. या घटनेची माहिती समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुढील तपास सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft Tried To Broke Bank Of Maharashtra ATM Machine In Mahableshwar Satara News