मोबाईल विकायला आला अन् चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

गोटे (ता. कऱ्हाड) येथील अन्नपुर्णा हॉटेलचे पाठीमागे वीटभट्टी आहे. तेथे असलेल्या घराचा पत्रा उचकटून चोरट्याने चोरी केली होती. सोन्याचांदीच्या दागिण्यांसह मोबाईल संचही चोरला होता. त्याच संचामुळे तो पोलिसांच्या जाळयात अडकला.

कऱ्हाड : घराचा पत्रा उचकटून तब्बल 26 हजारांचे दागिने लंपास करणारा चोरटा चोरी केलेला मोबाईल विकायला आल्याने पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कऱ्हाड तालुक्यातील गोटे येथे काल (गुरूवारी) रात्री झालेल्या चोरीचा तपास पोलिसांनी काही तासात उघडकीस आणला. पंकज तात्या पवार असे संबंधित चोरट्याचे नाव आहे. त्याने गोटे येथे चोरी केली आणि मोबाईल विकायला तो आगाशिवनगरच्या दांगट वस्तीत आला होता. तेथेच त्याचा अंदाज फसला त्याच परिसरातील खबऱ्याने पोलिसांना टीप दिली आणि संशयित गजाआड झाला.

कऱ्हाड पोलिसांनी सांगितले माहिती अशी, संबंधित चोरट्याने घराचा पत्रा उचटकटून चोरट्यांनी 26 हजारांचे सोन्या चांदीचे दागिण्यांसह मोबाईलही चोरून नेला होता. पोलिसांत त्याबाबतचा गुन्हाही नोंद झाला होता. गोटे येथील अन्नपुर्णा हॉटेलमागील घरात रात्री उशीरा ही चोरी झाली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच चोरट्याला पकडण्यात पोलिसांनी यश आले. संबंधित संशयित चोरटा मोबाईल विकण्यासाठी आगाशिवनगरला आला. त्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली. 

गोटे (ता. कऱ्हाड) येथील अन्नपुर्णा हॉटेलचे पाठीमागे वीटभट्टी आहे. तेथे असलेल्या घराचा पत्रा उचकटून चोरट्याने चोरी केली होती. सोन्याचांदीच्या दागिण्यांसह मोबाईल संचही चोरला होता. त्याच संचामुळे तो पोलिसांच्या जाळयात अडकला. घरफोडीची माहिती मिळाल्याने पोलिस घटनास्थळी पोचले. त्यांनी तेथील माहिती घेतली. त्यात मोबाईल चोरीचा धागा पकडून पोलिसांनी माग सुरू केला. पोलिस चोरट्याच्या मागावर होते.

 संशयित मोबाईल विकण्यास आगाशिवनगर दांगटवस्तीत आला आहे, अशी खबऱ्याने पोलिसांना माहिती दिली. हवालदार मारुती लाटणे यांनी त्वरीत हवालदार जयसिंग राजगे यांच्यासह दांडटवस्ती गाठली. त्याचा शोध घेतला असता एक संशयित व्यक्ती मोबाईल विकण्यासाठी आल्याचे समजले. त्यांनी त्याला हटकले आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली, असता त्याच्याकडे चोरी केलेला मोबाईल सापडला. त्यानंतर त्याने चोरीची कबुलीही दिली. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यापासून दोन तासातच गुन्हा उघड झाला. संबंधित संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thief came to sell the mobile and got caught by the police