एक दाेन नव्हे तेरा पाेलिस कोरोनाबाधित झाल्याने एसपी तेजस्वी सातपुतेंनी उचलले हे पाऊल

एक दाेन नव्हे तेरा पाेलिस कोरोनाबाधित झाल्याने एसपी तेजस्वी सातपुतेंनी उचलले हे पाऊल
Updated on: 

वाई (जि.सातारा) : येथील पोलिस ठाण्यात तेरा पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. पोलिस ठाण्याचे कामकाज तीन दिवस स्थगित करून भुईंज पोलिस ठाण्यातून चालवण्यात येणार आहे.
आज सीबीएसई दहावीचा निकाल; मनुष्यबळ विकासमंत्र्यांची माहिती
 
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी वाईत बाधित कर्मचाऱ्यांची भेट घेतली. सोमवारी रात्री शहरात 28 बाधित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाई पोलिस ठाण्यातील वाहतूक शाखेचे व इतर असे 13 कर्मचारी सोमवारी बाधित झाल्याचे आढळून आले. यामुळे जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली. त्यामुळे वाई पोलिस ठाण्यातील चार अधिकारी व 50 कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. पोलिस ठाण्यातील व उपअधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे चाचणीसाठी घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. या सर्वांचा अहवाल दोन दिवसांत येईल. पोलिस ठाण्यातील एकदम तेरा कर्मचारी बाधित आढळून आल्याने जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली.
 
पोलिस बाधित झाल्याचे आढळून येताच पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज सकाळी वाई पोलिस ठाणे व उपअधीक्षक कार्यालयाला भेट दिली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन बाधित पोलिस कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यांना प्रकृतीची काळजी घेण्यास सांगण्यात आले. त्यांनी पोलिस ठाण्यातील व उपअधीक्षक विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

दुधाचे करायचे काय...ते फोडताहेत टाहाे

कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्यास त्यापासून स्वतःची व कुटुंबीयांची कशी काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले. पालिकेच्या वतीने ताबडतोब पोलिस ठाण्याचे, उपअधीक्षक कार्यालय व पोलिस वसाहतीचे निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया सकाळपासून सुरू होती. पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचेही विलगीकरण करण्यात आले असून सहवासीत व कुटुंबीयांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

 'यांच्याशी' झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउन केला घाेषित 

सातारा : 'या' पालिकेतील लिपिकावर विनयभंगाचा गुन्हा 

पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर पोलिस ठाण्यापासून शंभर मीटर अंतरावरील मासे व चिकन विक्रेता व त्यांच्या कुटुंबीयांतील 18 व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. वाई तालुक्‍यात 183 रुग्ण बाधित असून, 97 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे. 80 रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात 59 रुग्ण, तर पसरणीत 19 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे बाजारपेठेसह अर्धे-अधिक शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बंद आहे. 

वाई पोलिस ठाण्यातील कर्मचारी बाधित झाले आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांना विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांचे स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवाल येईपर्यंत तीन दिवस वाई पोलिस ठाण्यातून होणारे कामकाज तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. भुईंज पोलिस ठाण्यातून येथील कामकाज चालेल. 

-तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक 

संपादन - सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Bengaluru Highway to Karad City
Satara News 17 Year Old Girl Dies In Family Dispute Over Mobile Phone And Television Father Loses His Temper
why Tapoḷa Ahir bridge is closed for traffic
Satara 17-year-old girl death case
Marathi News Esakal
www.esakal.com