
दहिवडी : मंत्रिपद हे शाश्वत नसून ही जनतेच्या सेवेसाठीची संधी आहे. मंत्री असलो तरी माझ्या मतदारसंघातील जनतेकडे माझं कधीही दुर्लक्ष होणार नाही. कारण मला जाणीव आहे, मंत्री होण्यासाठी आमदार व्हायला लागतं. मंत्रिपदाची जबाबदारी मोठी असली, तरी संपर्क कमी होणार नाही.