सुडाच्या धगीतून संपविले युवकास; मोर्वेतील तिघांना अटक

सुडाच्या धगीतून संपविले युवकास; मोर्वेतील तिघांना अटक

खंडाळा (जि. सातारा) : बारा वर्षांपूर्वी झालेल्या भावाच्या खुनाचा राग मनात धरून सुडाच्या भावनेतून लोखंडी अँगलने डोक्‍यावर व कोयत्याने तोंडावर वार केल्याने युवकाचा मृत्यू झाला. मोर्वे (ता. खंडाळा) येथे मंगळवारी हा प्रकार घडला. रवींद्र विलास बांदल (वय 38) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मोर्वेतील एकाच कुटुंबातील तिघांना  मंगळवारी अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्वे येथे विलास बांदल व त्यांचे कुटुंबीय शेती व्यवसाय करून राहात होते. त्यांचा मुलगा रवींद्र हा व्यवसायानिमित्त महाड येथे पत्नी व मुलासह राहात होता. गावाकडे घराचे बांधकाम चालू असल्याने चारच दिवसांपूर्वी तो महाड येथून गावी आला होता. मंगळवारी सकाळी गावातील मंदिरात दर्शनासाठी जातो, असे सांगून तो घराबाहेर गेला. दर्शन घेऊन घरी परत येताना भर रस्त्यात गावातीलच हेमंत धायगुडे याने पाठीमागून येऊन लोखंडी अँगलने रवींद्र याच्या डोक्‍यावर, तर काशिनाथ धायगुडे यांनी कोयत्याने कपाळ व तोंडावर वार केले. याच वेळी शांताबाई धायगुडे यांनी रवींद्रला शिवीगाळ केली.

महाविकास की भाजप; सातारा जिल्हावासियांना उत्सुकता निकालाची
 
दरम्यान, या मारहाणीनंतर जमलेल्या लोकांनी रवींद्र यास उपचारासाठी लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. रवींद्रचा खून केल्याप्रकरणी हेमंत धायगुडे, काशिनाथ धायगुडे व शांताबाई धायगुडे (सर्व रा. मोर्वे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना सायंकाळी अटक करण्यात आली.

शाब्बास ! कऱ्हाड पाेलिसांनी चाेरांसह पकडले साडे चार लाखांचे साेने
 
दरम्यान, घटनास्थळी रक्त पडलेल्या मातीचे नमुने तपासणीसाठी पथक मोर्वेत आले होते. याबाबत विलास बांदल यांनी खंडाळा पोलिसांत फिर्याद दिली असून, काशिनाथ धायगुडे यांचा मुलगा अंकुश याचा काही वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचा राग मनात ठेऊन मुलावर हल्ला केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फलटणचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे व पोलिस निरीक्षक संजय पतंगे हे तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com