धनकवडीतील पती- पत्नीस लुटणाऱ्या तिघांना अटक

धनकवडीतील पती- पत्नीस लुटणाऱ्या तिघांना अटक
Updated on

वाठार स्टेशन (जि. सातारा) : सोळशी- केदारेश्वर मंदिर रस्त्यावर चवणेश्वर गावच्या हद्दीत पुणे- धनकवडी येथील पती- पत्नीस तीन अनोळखी संशयितांनी दगडाचा धाक दाखवून हाताने मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम, मोबाईल असा दोन लाख 51 हजारांचा माल जबरदस्तीने चोरून नेला होता. या प्रकरणी सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले. 

या गुन्ह्याच्या अनुषंगाने संशयित आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख अजय बन्सल अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार कोरेगाव तालुक्‍याचे पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे व कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे पथक करून तपास सुरू केला. नऊ मार्च रोजी घोंगडे यांना दोन संशयित हे वाई परिसरात असल्याबाबत व एक जण लोणंद परिसरात असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली.

पाेलिसांच्या पथकाने सापळा लावून महेश ऊर्फ माक्‍या दत्तात्रय शिरतोडे (रा. मोती चौक, फलटण) व विकास ऊर्फ लाल्या अनिल जाधव (रा. बावधन, ता. वाई), हिमालय सतीश धायगुडे (रा. खेड बुद्रुक, ता. खंडाळा) या तिन्ही संशयितांना लोणंद व वाई परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. सोळशी- केदारेश्वर येथील गुन्हा व फलटण शहर, फलटण ग्रामीण येथे आणखी गुन्हे केल्याचे संशयितांनी कबूल केले. 

उत्तराखंडच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ असा अर्धवट राहण्याचा मुख्य दोष हा मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत बंगल्याच्या माथ्यावर फोडला जातो.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com