esakal | Maharashtra Budget 2021 : सातारा सैनिक स्कूलला येणार ऊर्जितावस्था; तीनशे कोटींची तरतूद
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget 2021 : सातारा सैनिक स्कूलला येणार ऊर्जितावस्था; तीनशे कोटींची तरतूद

येथील विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा मिळाव्यात तसेच शिक्षकांना पेन्शन मिळावी यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी देखील प्रयत्न केले.

Maharashtra Budget 2021 : सातारा सैनिक स्कूलला येणार ऊर्जितावस्था; तीनशे कोटींची तरतूद

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : राज्याच्या अर्थसंकल्पात आज (साेमवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा सैनिक स्कूलला तीनशे कोटीच्या निधीची तरतूद केल्याचे जाहीर केले. यामुळे येथील सैनिक स्कूल ऊर्जितावस्थेत येईल अशी आशा निर्माण झालेली आहे.

सातारा जिल्हा हा शूरवीरांचा आणि सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने स्वातंत्र्योत्तर काळात लढाईमध्येही मोठे योगदान दिले आहे. ही परंपरा आपल्या सैनिकांनी आजतागायत सुरूच ठेवली आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यातून सैन्यदलात भरती होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. सातारा येथे देशाची पहिली सैनिकी शाळा उभारण्यात आली. त्याचे नाव सैनिक स्कूल असे आहे. त्याची ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी सन 1961 रोजी पायाभरणी केली होती. मात्र, ते चालवण्यासाठी पुरेसा निधी मिळत नाही अशी खंत सातत्याने लाेकप्रतिनिधींपुढे शाळा व्यवस्थापन मांडत हाेते. 

येथील विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा मिळाव्यात तसेच शिक्षकांना पेन्शन मिळावी यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी देखील प्रयत्न केले. आता राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी सैनिकी शाळेला तीन वर्ष ३०० कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले. यापैकी २०२१-२२ या कालावधीत १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल असेही अर्थमंत्री पवार यांनी नमूद केले.

पाेलिसांनी पकडल्यानंतर गजा मारणे म्हणाला, फक्त दोनच दिवस राहिले होते

Maharashtra Budget 2021 : अर्थमंत्री अजित पवारांनी बजेटमध्ये मुंबईबद्दल मांडलेले २० महत्वाचे मुद्दे

अर्थसंकल्पात पुण्याला काय मिळाले?

Maharashtra Budget 2021: सांगली जिल्हा रुग्णालयासाठी भरीव तरतूद; वर्षानुवर्षे रेंगाळलेला प्रकल्प मार्गी

Maharashtra Budget 2021: सिंधुदुर्गच्या मेडिकल कॉलेजसाठी अर्थसंकल्पीय तरतूद

खाकीच्या डाेळ्यातून ओघळले अश्रु; आईसह मुलगा जळून खाक 

loading image