Satara News : घरात आई-वडिलांसोबत झोपलेल्या चिमुकलीवर कुत्र्याने केला हल्ला; फलटणच्या महात्मा फुले चौकातील घटनेने परिसर सुन्न

Fatal Stray Dog Attack : फलटणच्या महात्मा फुले चौकात आई-वडिलांसोबत झोपलेल्या अवघ्या तीन महिन्यांच्या बालिकेवर श्वानाने हल्ला केला. गंभीर जखमा आणि अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला.
Three-month-old baby dies after a dog attack in Phaltan.

Three-month-old baby dies after a dog attack in Phaltan.

sakal

Updated on: 

फलटण : आई- वडिलांच्या कुशीत सुरक्षित झोपलेल्या अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचा श्‍वानांच्‍या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना फलटणच्‍या महात्मा फुले चौकात आज सकाळी उघडकीस आली.आई- वडिलांसह झोपलेल्या बालिकेवर कुत्र्याने हल्ला करून चावा घेतल्याने तिला गंभीर दुखापत झाली. या जखमांमधून झालेल्या अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...